सोमवार, २३ मे, २०११

अधून-मधून जे सुचलं ते असं....
माझ्या आभाळातून अवचित
हरवलेले काही रंग
काल मला तुझ्या चित्रात दिसले.
प्रत्येक रंग बैरागी, इंद्रधनुषी...
जणू माझ्या कोऱ्या आभाळावर हसणारे
रंग घेतलेस तर घे खुश्शाल
पण आता माझं आभाळही
तुच दे ना रंगवून
शिल्लक राहिलेल्या रंगांतून...



खडा हूँ उसी नुक्कड पर,
अरमानों का अंबार लेकर
अब तो आ जाओ
मेरे जन्नत के तुकडे लिए..



एक निखारा तु खा, एक मी पण खातो
दोघेही पेटून जाऊ आणि देऊ पेटवून
भेटणारा प्रत्येकजण.....
मित्रा,
गावागावात वणवा पेटलाच पाह्यजे
त्याबिगर चुली पेटणारच नाहीत...


इकडे पावसानं रात्रभर आभाळ फाडलंय
तिकडची भांडी मला आठवतायत
घरभर पसरलेली
आकाशातला पाऊस झेलून घेणारी
एका कोप-यात कुतूहलाने पाहणारे दोन डोळे आणि कागदाच्या होड्या करणारे म्हातारे हात
पदराने ओली झालेली डोकी पुसताना
पाठीत बसलेल्या झपाट्याची ऊबही....
मी आजच बापाला लिवलंय..
थोडे पैसे पाठव..
छत्री घेतल्याबिगर
भायेर जाता येईना झालंय...



कुछ यादे कुछ बातें

कुछ कही कुछ अनकही

समय के पन्नो पर

कुछ छाप की तरह छपी हुई

पेडों के तनों पर अंदर तक

खुरच कर लिखी हुई

यादों के सायों मे

आज भी कुछ अंधेरे है

हम रोशनी लाए है

जिंदगी तुझे एक बार तो

दरवाजा खोलना पडेगा..




प्रिय आई,

दिवाणखान्यात जमलेल्या माणसांत

तु मात्र नेहमीच गायब

आणि अवतरायची एकदाची

चहाचा ट्रे घेउन, पण उशीराने

गर्दी उतरल्यावर

तुझं आभाळ शोधत रहाणं

जाणवत रहायचं रिकाम्या कपांत

तुझ्या बांगड्यांच्या किणकिणीत

आणि पाण्याच्या किरीकिरीत

चेह-यावर हसू घेऊन पुन्हा

तुझं दिवाणखान्यात येणंही

अल्पविरामास पूर्ण करण्यासाठी..