मंगळवार, ५ एप्रिल, २०११

निश्चय...


मेट्रोतून उतरल्यानंतर पाय-या उतरून घरी जाण्याची घाई सर्वांनाच असते. पण प्रत्येकाला ती नडतेच असे नाही. गेले काही दिवस तरी माझा हाच समज होता. शुक्रवारचे काम आटोपून घरी येत असताना पाय-यांवरून पाय घसरल्यानंतर या समजाला तडा गेला. दुखरा पाय घेऊनच स्टेशनच्या बाहेर पडलो पण तोवर एकही रिक्षा उपलब्ध नव्हता.त्या एरियातले लाईटस् गेले होते त्यामुळे समोरून काय येत आहे याची जाणीवही होत नव्हती.दुखरा पाय जमीनीवर टेकविणे कष्टाचे जात असतानाही मी घरापर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. हा मीटर अंतरही चालून गेलो नसेल एवढ्यात समोरुन एक रिक्षा येताना दिसला. त्याला हात करताच तो थांबलाही.
मी विचारले, 'पॉकेट सिक्स चलोगे भाई ?'

त्यावर त्याने एकवेळ सायकलला अडकविलेल्या पिशवीकडे पाहिले आणि मला काय उत्तर द्यावे असा विचार करीत असतानाच मी त्याला पुन्हा विचारले.' बोलो, चलोगे या नहीं ?'
त्यावर तो म्हणाला, 'अगर पाँच मिनिट रुक सकते हो तो छोड दूँगा आपको घरतक'.
दुसरा रिक्षाही उपलब्ध नाही आणि पायाने असहकार पुकारलेला असल्यामुळे मी त्याला होकार दिला.रिक्षात बसल्यावर त्याने तो मेट्रो पुलाकडे वळविला.हातानेच ढकलत त्याने मेट्रोच्या पुलापर्यंत आणलाही. पुलाच्या पिलरपासून पाच-दहा मीटर अंतरावर त्याने मला थांबवून सायकलला अडकविलेली पिशवी काढली आणि पळतच तो पिलरच्या दिशेने धावला. पिलरजवळ बसलेल्या तीन आकृतींकडे त्याने ती पिशवी दिली. खिशातून काहीतरी काढून दिले. बहुधा ते माचिस असावे. कारण त्यानंतर लगेचच क्षणभरासाठी तेथे थोडा उजेड दिसला. उजेड चमकताच तो माझ्याकडे पळतच आला आणि पँडेल मारत त्याने रिक्षा सुरु केला. मी विचारले,'कौन था वहाँ ?'
त्यावर तो म्हणाला, 'जी बाबूजी, घरवाली और बच्चे है वहाँ पर. कुछ धंदा हुवा नही आज तो दूध ले आया था उनके लिए. वही दूधही गरम कराने के लिए बीबी को बोल आया.'
मी विचारले, 'क्यूँ क्या हुवा आज? कम से कम सौ रुपये का धंदा तो होना चाहीए ना.'
यावर तो म्हणाला, 'क्या बताए बाबूजी, दो-तीन दिन से हम बस्स भाग रहे है बच्ची को लेकर. इसिलिए ना धंदा हो रहा है ना कुछ.'
'बच्ची को लेकर ? क्या हुवा भाई ? ' मी त्याला विचारले.
त्यावर तो म्हणाला, 'बाबूजी, बडे लोगों के छोटे लक्षण है जी. बच्ची पार्कींग साईड मे खेल रही थी अपने भाई के साथ तभी एक अमीरजादे ने टक्कर मारी. पैर की हड्डी तुट गयी. दो दिन हुए दर्द से तडप रही है बिटीया.' त्याने हे सांगताच माझ्या काळजात चर्र झाले.
मी विचारले, 'तो आपने उसको पकडा नहीं ?' माझा प्रश्न पुर्ण व्हायच्या आत पॉकेट सिक्स चे गेट आले. मी रिक्षातून खाली उतरलो.
तो म्हणाला, 'पकडा तो था बाबूजी. वह पास के अस्पताल में भी ले आया. अस्पताल में डाक्टर बोला की पुलीस केस होगा. डॉक्टर की बात सुनते ही वो भाग गया वहाँ से. जाते वक्त हमारी तरफ हजार-हजार के ये दो नोट फेंक गया.' त्याने खिशातून दोन नोटा काढून मला दाखविल्या.
मी म्हणालो, 'अरे तो फिर पुलीस में केस क्यूँ नही किया. गाडी का नंबर तो लिखा होगा.'
त्यावर त्याने रिक्षाच्या पांढ-या छताकडे हात दाखविला आणि म्हणाला,' बाबूजी हमने तो लिख लिया उसका नंबर उसी वक्त. पुलीस को भी बताया मगर पुलीसवालों ने पैसे लेकर मामले को दबा दिया. मै कोर्ट में केस डालूंगा साहब.' त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.
मी म्हणालो, 'वह सब ठिक है मगर बच्ची का इलाज किया या नहीं. कम से कम इलाज तो करते बच्ची का उस पैसे से.'
'इलाज तो किया बाबूजी मगर उसके पैसे से नहीं. हमारी पुरे साल की कमाई लगा दी हमने बाबूजी.' त्याने सांगितले.
मी म्हणालो,' तो उसके पैसे का क्या करोगे ?
त्यावर तो म्हणाला,' जी कोरट में दिखाऊंगा उसने मेरे उपर यह दो नोट फेंके थे. सबसे बडी अदालत तक जाऊंगा मगर उस अमीरजादे को सजा दिलाऊँगा.' त्याने दृढ निश्चयाने उच्चारलेले वाक्य त्याच्या चेह-यावरही दिसत होते. एवढ्यात लाईटस् आल्या.
मी म्हणालो, 'भाई, तुम्हारी मनोकामना पुरी होगी ऐसा यह संकेत है. देखो. वैसे क्या नाम है तुम्हारा ?'
'जी संकर पासवान.' तो उत्तरला.
'क्या मेट्रो के पुलीया के नीचे ही रहते हो ?' मी विचारले.
'जी,वही रहते है. पिछली चार तारीख को आए थे बच्चे हमसे मिलने के लिए. इसी महिने गाँव वापस जाने का भी सोचा था. मगर यह हादसा हो गया.' त्याने सांगितले.
'तो फिर घर ही क्यूँ नही चले जाते ? ' मी विचारले.
'अब तो घर जाएंगे तो उस अमीरजादे को जेल पहूँचाकर ही. हम तो उसका सब कच्चा चिठ्ठा ले आए है. इसी एरिया में रहता है गोपाल-धाम सोसायटी में. उसके बाप की दुकान है आशीर्वाद चौक में. नाम भी ले आए है उसका.' त्याने सांगितले.
मी म्हटले,' कर पाओगे तुम ?'
यावर तो म्हणाला, 'साब बच्ची को कराहते सुनता हूँ तो लगता है की, उसकी गाडी तो तोड डालूँ, उसकी गर्दन दबा डालूँ या फिर उसकी वहीँ टाँग तोड डालू. उसकी गाडी दिखती भी है इसी एरीया में. मगर मै उसे कोरट मे खिचूँगा. गरीब का भी खुन लाल होता है साब.' तो म्हणाला.
त्याच्या निश्चयापुढे मी निरूत्तर झालो,' कुछ जरुरत पडे तो बताना जरुर. मै पत्रकार हूँ और यहीँ रहता हूँ' मी त्याला सांगितले आणि खिशातली शंभराची नोट त्याच्या हातात ठेवली.
'बच्ची को मिठाई ले आना मेरी तरफ से.' मी म्हणालो.
त्याने ती नोट खिशात ठेवली आणि म्हणाला, 'बाबूजी आप लिखना जरूर उस अमीरजादे की करतूत. मै सबसे उपरी कोरट तर जाऊँगा मगर अब चुप नहीं बैठूंगा....'
लाईटस् आल्या होत्या त्यामुळे संपुर्ण रस्ता प्रकाशाने उजळून निघाला होता. पायातल्या वेदना कमी झाल्या होत्या परंतु मनातली जखम पुन्हा ओली झाली होती. शंकर पासवान त्याचा रिक्षा वळवून आपल्या आणि फाटक उघडून मी माझ्या पिल्लाकडे निघालो....